Shahabuddin Became Shyamlal : दुःखी शहाबुद्दीन पुन्हा बनले श्यामलाल : दर्ग्यात कव्वालीऐवजी केले सुंदरकांडचे पठण

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे असेही पडसाद

शहाबुद्दीन (उजवीकडे) पुन्हा बनले श्यामलाल

इंदूर (मध्यप्रदेश) – पहलगाम आतंकवादी आक्रमणामुळे दुःखी झालेले शहाबुद्दीन केवळ हिंदु धर्मात परतले नाहीत, तर त्यांनी दर्ग्याच्या परिसरात कव्वालीऐवजी सुंदरकांड पठणही केले.

१. श्यामलाल निनोरी गेल्या ४० वर्षांपासून सय्यद निजामुद्दीनच्या दर्ग्याची सेवा करत होते. या काळात स्थानिक लोकांनी त्यांना मुसलमान मानले आणि त्याचे नाव शहाबुद्दीन ठेवले. श्यामलाल हेही स्वतःला शहाबुद्दीन मानू लागले.

२. शहाबुद्दीन आणि त्याचे कुटुंब मुसलमानांप्रमाणे रमझानच्या काळात रोझे (उपवास) पाळत असत, तसेच नमाजपठणही करत होते. एवढेच नव्हे, तर ते इस्लामच्या सर्व धार्मिक श्रद्धांचे पालन करत होते. लोक त्यांना ‘दर्गावाले बाबा’ या नावानेही ओळखत होते.

३. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात जिहादी आतंकवाद्यांनी २८ हिंदु पर्यटकांना ठार मारल्यानंतर शहाबुद्दीन यांचे मन पालटले. स्थानिक नगरसेवक जितू यादव यांच्या पुढाकाराने त्यांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आणि ते पुन्हा श्यामलाल झाले.

४. यानंतर श्यामलाल यांनी दर्गा परिसरात कव्वालीऐवजी सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आणि पहलगाम आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी नगरसेवक जीतू यादव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.