Sambhal Broken Idols Found : संभल (उत्तरप्रदेश) येथे सापडलेल्या शिवमंदिराजवळील विहीर खोदतांना सापडल्या ३ खंडित मूर्ती

विहीर खोदतांना सापडलेली खंडित मूर्ती
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संभल (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल भागात सापडलेल्या शिवमंदिर  परिसरात असलेल्या प्राचीन विहिरीच्या उत्खननाच्या वेळी भगवान शिव, गणेश आणि माता पार्वती यांच्या खंडित मूर्ती सापडल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोचून मूर्ती नियंत्रणात घेतल्या आहेत. विहिरीतील माती आणि ढिगारा यांमध्ये या मूर्ती सापडल्या. विहीर खोदण्याचे काम अजूनही चालू आहे. ४६ वर्षांपासून बंद असलेल्या पुरातन शिवमंदिरात दर्शन आणि पूजा करण्यासाठी लोक येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्थानिक लोक हे मंदिर २०० वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानतात. मंदिराची जीर्ण स्थिती सुधारण्यासाठी प्रशासन आणि भाविक यांनी पुढाकार घेतला आहे. आचार्य विनोद शुक्ला यांनी सांगितले की, सध्या तात्पुरती पूजा केली जात आहे; मात्र लवकरच कायमस्वरूपी पुजारी नियुक्त करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत.