स्वतःमधील शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागृत करून राष्ट्ररक्षणार्थ सिद्ध व्हा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आपल्या धर्माचे रक्षण झाले, तर भारत हा एकमेव असा देश आहे जो खर्‍या अर्थाने विश्‍वगुरु होऊ शकतो. त्यामुळे सर्व युवांनी धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील अशुद्ध फलकांद्वारे मराठीची पायमल्ली करणार्‍यांवर कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे…

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कर्महिंदु बना ! – निरंजन चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

आज विविध प्रकारच्या आक्रमणांनी देव, देश आणि धर्म संकटात आले आहेत. यांचे रक्षण करायचे असेल, तर आपण केवळ जन्महिंदु असून चालणार नाही, तर कर्महिंदु बनले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी केले.

हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून  हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया ! – सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. त्याच हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.

महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करावी ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी करावी ! मुळात अशी मागणी हिंदूंना करण्यासही लागू नये, सरकारने ती स्वतःहून करून हिंदूंच्या सदिच्छा घ्याव्यात, असेच हिंदूंना वाटते !

सामाजिक माध्यमातून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गावामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करत आहेत !

‘आपण पाठवलेल्या ‘पोस्ट’ आम्ही आठवणीने वाचतो आणि पहातो, तसेच त्या इतर गटांना (ग्रुपवर) पाठवतो. आम्ही जितका शक्य होईल, तितका हिंदु धर्माचा प्रचार आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा !

तहसीलदारांच्या वतीने वसंत उगले आणि पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी निवेदन स्वीकारले.

दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ ‘महिला शौर्यजागृती’ या विषयाची संहिता लिहितांना आणि व्याख्यान घेतांना आलेल्या अनुभूती

‘महिला शौर्यजागृती’ या विषयावरील व्याख्यानाची संहिता लिहितांना आणि व्याख्यान घेतांना एका साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .

हिंदु जनजागृती समितीचा गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच गोवा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात श्री. मनोज खाडये यांनी उद्योजकांना ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर माहिती सांगितली.

कच्चुरू-उडुपी (कर्नाटक) येथील श्री नागेश्‍वर भजनी मंडळात प्रथमोपचाराविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

कच्चुरू-उडुपी येथील श्री नागेश्‍वर भजनी मंडळाच्या सदस्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ‘प्रथमोपचार’विषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.