पोलीस प्रशासनाचा निर्णय
नाशिक – विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल घोषित करण्यात आल्यावर येथे शहरात विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. गुलाल उधळण्यास अनुमती आहे; पण डीजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) वाजवण्याची अनुमती दिलेली नाही. नाशिक शहरातील प्रत्येक उमेदवाराचे कार्यालय आणि निवासस्थान यांच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल.
संपादकीय भूमिकाअसा निर्णय सर्वच जिल्ह्यांतील पोलिसांनी घ्यायला हवा ! |