धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावरील नियंत्रणासाठी स्थापन केलेली निष्क्रीय समिती त्वरित विसर्जित करा !- वैद्य उदय धुरी, आरोग्य साहाय्य समिती

हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन एप्रिल २०१७ आणि डिसेंबर २०१७ मध्ये राज्य आर्थिक साहाय्य करत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथे शासकीय योजनेची प्रसिद्धी आणि कार्यवाही होते का, याचा अभ्यास केला होता. बर्‍याच रुग्णालयांत शासकीय योजनेची प्रसिद्धी केली जात नसल्याचे लक्षात आले.

अधिकाधिक लाभापायी औषध विक्रीद्वारे जनतेला लुटणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची खासदारांकडे मागणी

औषधांच्या विक्रीतून अधिक नफा मिळवून लोकांची प्रचंड लूट करण्यात येत आहे. असे करणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘आरोग्य साहाय्य समिती’कडून येथे काही खासदारांना देण्यात आले. तसेच ‘हा विषय संसदेत उपस्थित करावा’, अशी विनंतीही या खासदारांना करण्यात आली.