मतदारसूची कशा सिद्ध केल्या जातात, त्याचे उदाहरण !
पुणे – ‘अहो साहेब, मी जिवंत आहे !’ असे सांगत मतदारसूचीमध्ये मृत नोंद दाखवलेल्या ८९ वर्षांच्या आजी श्रीमती पारुबाई उंद्रे यांनी मतदानाचा हक्क बजावला. हा प्रकार मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रात घडला. श्रीमती पारुबाई नातवाच्या समवेत मतदान केंद्रावर गेल्या. तेव्हा या नावाची व्यक्ती मृत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. आजींनी मतदानाची पावती, ओळखपत्र दाखवत ‘मला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे’, असा आग्रह धरला. तेव्हा अधिकार्यांनी आजींचे मतदान करून घेतले.
संपादकीय भूमिकामतदारसूचीमध्ये जिवंत व्यक्तीचे नाव मृत असणे, हे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे द्योतक ! |