४ स्थानकांवर वायू गुणवत्ता निर्देशांक २२० हून अधिक !
नागपूर – राज्याची उपराजधानी नागपूर येथे वाढत्या थंडीमुळे हवा खराब होत आहे. शहरातील अंबाझरी, जीपीओ, रामनगर आणि महाल या ४ स्थानकांवर प्रतिघंट्याला हवेच्या संदर्भातील नोंदी घेतल्या जात आहेत. या ४ स्थानकांवर वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) २२० च्या वर पोचला आहे. हा निर्देशांक म्हणजे वाईट हवेचा मानक आहे. तज्ञांच्या मते, प्रतिवर्षी थंडी वाढल्यावर प्रदूषणातही वाढ होते. हिवाळ्याच्या कालावधीत हवेची गुणवत्ता खराब असते. तीच स्थिती यावर्षीही दिसून येत आहे. शहरातील प्रदूषणास ‘पार्टीकुलेट मॅटर’ (धुलीकण) हाच सर्वांत मोठा घटक कारणीभूत आहे. पी.एम्-२.५ आणि पी.एम्. १० या प्रदूषकांच्या वाढीमुळे येथे प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असल्याने धुलीकणांचे प्रमाण वाढत आहे.
संपादकीय भूमिकानागपूरची सद्यस्थिती पहाता उपराजधानी हळूहळू दुसरी देहली होण्यास वेळ लागणार नाही ! असे होऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत ! |