रामराज्य साकारण्यासाठी महाराष्ट्रातील हिंदूंनी १०० टक्के मतदान करावे ! – प.पू. ईश्वरबुवा रामदासी

मिरज (जिल्हा सांगली) येथे उत्साही वातावरणात ‘वारकरी संत संमेलन’ पार पडले !

शेळगाव (जिल्हा सोलापूर) येथे दिंडीत टेंपो शिरल्याने दोन वारकर्‍यांचा मृत्यू !

बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे कार्तिकी एकादशीची वारी पूर्ण करून गावात परतणार्‍या वारकर्‍यांच्या दिंडीत भरधाव वेगाने जाणारा टेंपो शिरल्याने झालेल्या अपघातात २ वारकर्‍यांचा मृत्यू झाला असून ६ वारकरी गंभीर घायाळ झाले आहेत.

Pandharpur Kartik Yatra : वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी १ सहस्र ६२५ पोलीस अधिकारी तैनात

वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी, तसेच चोरी रोखण्यासाठी ‘माऊली स्क्वॉड’ची स्थापन करण्यात आली असून यामध्ये वारकरी आणि नागरिक यांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.

कार्तिक यात्रेसाठी कोल्हापूर येथून ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन !

१२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी भाविक आणि वारकरी यांच्या सोयीसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पाळधी (जळगाव) ते शेगाव दिंडीत भजन म्हणणे, वाद्य वाजवणे याला पोलिसांचा विरोध !

हिंदूंना सुरक्षितपणे, तसेच मोठ्या उत्साहात दिंडी काढता यावी, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कार्तिकी वारी जवळ येत असतांना इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रदूषणाच्या विळख्यात !

प्रशासनाच्या लेखी वारकर्‍यांच्या भावनांची किंमत शून्य आहे का ? तसेच एरव्ही हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची ओरड करणारे पुरो(अधो)गामी, तथाकथित पर्यावरणप्रेमी आता कुठे आहेत ?

संत वासुदेव महाराजांचे श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र आळंदीपर्यंत पायी दिंडी !

येथील संत वासुदेव महाराजांच्या श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्री क्षेत्र आळंदी देवाच्या पायी दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीचे आयोजन ४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत केले आहे.

कार्तिकी वारीत संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून नियोजन करावे ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी, भाविक यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, अशा सूचना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

‘जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्‍या शासकीय समितीतून शाम मानव, मुक्‍ता दाभोलकर आणि अविनाश पाटील यांची हकालपट्टी करा !

वास्‍तविक अशी मागणी करण्‍याची वेळ वारकर्‍यांवर येऊ नये. सरकारने स्‍वतःहून ही कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

मंगळवेढा येथे मोठी संत परंपरा ! – समाधान आवताडे, आमदार, भाजप

मंगळवेढा येथे संत परंपरा मोठी आहे, तसेच पंढरपूर हे हाकेच्‍या अंतरावर आहे. त्‍यामुळे वारकरी भवन येथे उभारले गेले.