मुंबई – निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचे एकूण मतदान ६५.११ टक्के झाल्याचे यापूर्वी घोषित केले होते; मात्र तपशीलवार मोजणी केल्यानंतर मतदानाची एकूण टक्केवारी ६६.०५ असल्याचे निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे. राज्यात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ सहस्र १९५ नागरिकांनी मतदान केले. यामध्ये ३ कोटी ३४ लाख ३७ सहस्र ५७ पुरुष, ३ कोटी ६ लाख ४९ सहस्र ३१८, तर अन्य १ सहस्र ८२० जणांनी मतदान केले.