दौंड (जिल्हा पुणे) – मुंबई-होस्पेट एक्सप्रेसमध्ये बाँब ठेवल्याचा निनावी दूरभाष आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने दौंड रेल्वेस्थानकात ही एक्सप्रेस दीड घंटा थांबवून ठेवली. लोहमार्ग पोलीस आणि आर्.पी.एफ्.च्या पथकाने रेल्वेतील डब्यांची कसून पडताळणी केली. डबा क्रमांक डी १, डी २, डी ३, डी ४ यांसह सामान्य (जनरल) डब्याची कसून पडताळणी केली; परंतु या गाडीमध्ये कोणतीही बाँबसदृष्य वस्तू आढळली नाही; मात्र बाँबविषयीच्या निनावी दूरभाषमुळे रेल्वे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. दीड घंट्यानंतर ही गाडी दौंड स्थानकातून होस्पेटकडे रवाना करण्यात आली.