प्रीतीस्वरूप असलेल्या सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा मराठे (वय ८४ वर्षे) यांचा पुणे येथे देहत्याग

त्यांच्या पार्थिवावर लाल बहादूर शास्त्री रस्ता येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

महंत नरेंद्र गिरि यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.टी. पद्मनाभन् यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन !  

गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रांतील योगदानासाठी जगभरात ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.टी. पद्मनाभन् (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने १७ सप्टेंबर या दिवशी पुण्यात निधन झाले.

नावडे (जिल्हा रायगड) येथील पू. शांताराम महाराज खानावकर (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

निधन वार्ता

सनातनच्या  साधिका सौ. निलांबरी ओझरकर यांचे वडील मधुकर चिंधुशेठ दुसाने (वय ८७ वर्षे) यांचे २५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १०.३० वाजता धुळे येथे वृद्धपकाळामुळे निधन झाले. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) यांचा देहत्याग !

त्यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते.

देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. राहुल मोरे (वय ३५ वर्षे) यांचे आजारपण, उपचार आणि त्यांचे निधन यांच्या संदर्भात त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती !

१०.८.२०२१ या दिवशी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधक राहुल सदाशिव मोरे यांचे निधन झाले. आज २१.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

यजमानांच्या निधनानंतर साधनेच्या बळावर स्थिर रहाणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्रीमती अमृता अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. ते रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी श्रीमती अमृता संभूस यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.