गडचिरोली – जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरगांव येथील सरपंच मारोती गेडाम (वय ५० वर्षे) यांनी तक्रारदाराच्या रस्ता बांधकामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करून देण्याच्या कामासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहात पकडून अटक केली. (अशा भ्रष्ट सरपंचाना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. – संपादक) पथकाने २२ नोव्हेंबर या दिवशी ही कारवाई केली.
तक्रारदाराने रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले होते. बांधकामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करून देण्यासाठी मुरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच मारोती गेडाम यांनी तक्रारादाराला ९० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ७५ सहस्र रुपये द्यायचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग ! |