World Women’s Day Kolhapur : पालटत्या जागतिक अस्थिर स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !

‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्तार व्हायलाच हवा ! – छत्रपती उदयनराजे भोसले

हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी त्यांना याविषयाचे निवेदन दिल्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले. या प्रसंगी माजी नगरसेविका सौ. लीला निंबाळकर आणि सनातन संस्थेचे श्री. सुरेश पंडित उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलीदान दिले, आपण १ घंटा तरी देऊया ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा प्रत्येक अवयव आणि रक्ताच्या एक एक थेंबाचा त्याग केला होता.

मुंबईतील बेस्ट बसमधील सूचनांतील अशुद्ध मराठी शब्दांमुळे भाषाप्रेमी संतप्त !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीची असणारी ही दुःस्थिती दुर्दैवी ! मुंबईतील बेस्ट बसगाड्यांमधील सूचना फलकांमधील अशुद्ध मराठी शब्द पाहून मराठी भाषाप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे बेस्टचा दर्जा सुधारत असतांना दुसरीकडे मराठी भाषेचा दर्जा का घसरत आहे ?

कोल्हापूर : कार्यालयातील फलक तातडीने पालटणारे निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांचे हिंदुत्वनिष्ठांकडून अभिनंदन !

कोल्हापूर, ३ मार्च (वार्ता.) – जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सभागृहाचे नाव तात्काळ पालटणारे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांचे सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने त्यांच्या कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘दैनिक सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या सूचनेनंतर ‘छत्रपती शिवाजी सभागृह’, अशी पाटी पालटून ती ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृह’ … Read more

धर्मवीर बलीदानमास पाळणार्‍या विद्यार्थ्यांना रांगायला लावणार्‍या शाळेच्या मुख्याध्यापकांवर तात्काळ कारवाई करा !

धर्मवीर बलीदानमास पाळणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारे शिक्षक असणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार होतील का ?

 हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्कार !

शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्‍या  धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लव्ह जिहादच्या विरोधात करण्यात येत असलेला संघर्ष आणि आलेले अनुभव

हिंदु संस्कृती जेव्हा घराघरांत बहरून येईल, त्या दिवशी लव्ह जिहाद आपोआप थांबेल. मुली प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, हिंदी चित्रपट यांच्या अधीन झालेल्या असतात; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.

निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील ४४ ‘एफ्’मधील जागा ‘इस्लाम असोसिएशन’ला देण्याचा निर्णय रहित करा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील ४४ ‘एफ्’मधील जागा सर्व धर्मियांसाठी राखीव असतांना ही जागा ‘इस्लाम असोसिएशन’ला देण्याचा घाट नगरपालिका प्रशासन घालत आहे.

Fake HSRP Number Plates : वाहनांच्या ‘उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स’च्या अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुराज्य अभियानची सरकारकडे मागणी!

महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आर्.टी.ओ.) अलीकडेच बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ची (एच्.एस्.आर्.पी.) विक्री करून या प्रणालीचा अपलाभ उठवणार्‍या अनधिकृत विक्रेत्यांना चेतावणी दिली.