हिंदु जनजागृती समितीचे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’

१४ मार्च धूलिवंदन आणि १९ मार्च रंगपंचमी या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात येणार आहे. या अभियानाचे यंदाचे हे २३ वे वर्ष आहे.

क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रामध्ये फेकून द्या ! – हिंदु एकता आंदोलनाची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?

नंदुरबारमधील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू होणार !

अधिवेशनात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतून, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा (दोंडाईचा) येथूनही जवळपास ९० हून अधिक मंदिरांचे १५० हून अधिक विश्वस्त, अर्चक, पुरोहित, सेवेकरी उपस्थित होते.

अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानच्या शेतभूमी देवस्थानाच्या नावावर पूर्ववत् होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्‍यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्ताराला पूर्ण पाठिंबा ! – अमित कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ, सिनेट सदस्य 

या मागणीसाठी माझा पूर्ण पाठिंबा असून हा विषय सातारा येथील छत्रपती घराण्यापर्यंत मी पोचवेन, तसेच या संदर्भात जे जे करणे शक्य आहे ते सर्व मी करेन, असे मत शिवाजी विद्यापिठाच्या सिनेटचे सदस्य आणि ‘डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी’च्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

World Women’s Day Kolhapur : पालटत्या जागतिक अस्थिर स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !

‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्तार व्हायलाच हवा ! – छत्रपती उदयनराजे भोसले

हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी त्यांना याविषयाचे निवेदन दिल्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले. या प्रसंगी माजी नगरसेविका सौ. लीला निंबाळकर आणि सनातन संस्थेचे श्री. सुरेश पंडित उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलीदान दिले, आपण १ घंटा तरी देऊया ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा प्रत्येक अवयव आणि रक्ताच्या एक एक थेंबाचा त्याग केला होता.

मुंबईतील बेस्ट बसमधील सूचनांतील अशुद्ध मराठी शब्दांमुळे भाषाप्रेमी संतप्त !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीची असणारी ही दुःस्थिती दुर्दैवी ! मुंबईतील बेस्ट बसगाड्यांमधील सूचना फलकांमधील अशुद्ध मराठी शब्द पाहून मराठी भाषाप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे बेस्टचा दर्जा सुधारत असतांना दुसरीकडे मराठी भाषेचा दर्जा का घसरत आहे ?