हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्कार !

डावीकडून सर्वश्री गिरीराज विजय बाईंग (बाबा), सतीश शेट्टी, पुरस्कार स्वीकारतांना विनोद रसाळ, श्री कालीचरण महाराज, सर्वश्री देवेंद्र कोठे, सुधीर बहिरवडे, अंबादास गोरंटला

सोलापूर – येथील शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्‍या  धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांचाही पुरस्कारार्थी म्हणून समावेश होता. ॐ काली हिन्दवी स्वराज्य सेना श्रद्धास्थान, पूजनीय कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी व्यासपिठावर आमदार देवेंद्र कोठे, तसेच ॐ काली हिंदवी स्वराज्य सेनेचे कार्याध्यक्ष हिंदुश्री गिरीराज विजय बाईंग, मुंबई प्रदेशाध्यक्ष हिंदुश्री सतीश शेट्टी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हिंदुश्री उल्हास धायगुडे-पाटील, विशाल पवार, गोसेवक सुधीर बहिरवडे, हिंदुत्वनिष्ठ अंबादास गोरंटला उपस्थित होते.

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे धर्मावरील आघातांत वाढ ! – श्री कालीचरण महाराज

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज हिंदु धर्मावर होणारे आघात वाढत आहेत. हिंदु समाजाला धर्मशिक्षित करणे आणि धर्मरक्षणासाठी सिद्ध करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन श्री कालीचरण महाराज यांनी केले. शिवस्मारक येथे धर्मरक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ‘जाती-पाती दूर सारून सर्व हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाखाली एकत्र यावे’, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

ह.भ.प. श्री. सुधाकर (महाराज) इंगळे (अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष), अधिवक्ता अजिंक्य राजाराम जाधव, श्री. पंकज अनिल काटकर (भाजप युवा मोर्चा सरचिटणीस), अधिवक्ता नरसुबाई गदवालकर, ह.भ.प. श्री. आकाश (महाराज) शिरते (अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळ शहर संपर्क प्रमुख), श्री. प्रशांत राम पवार (महिला संरक्षक आणि गोरक्षक), श्री. मनीष अजयकुमार काळजे (जिल्हाप्रमुख, शिवसेना), श्री. शिवराज प्रकाश गायकवाड (ओमसाई प्रतिष्ठान, संस्थापक अध्यक्ष) यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्कार देण्यात आला.  कार्यक्रमात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह महिलांची पुष्कळ उपस्थिती होती.