Maharashtra Deputy CM On IFTAR PARTY : (म्हणे) मुसलमानांना धमकावण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार !  

मुसलमानांच्या हिंदूंवरील आक्रमणांवर मौन बाळगणारे अजित पवार यांचे इफ्तारच्या मेजवानीत विधान !

(इफ्तार म्हणजे मुसलमानांचे रमझानच्या काळात उपवास सोडणे)

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : मुसलमानांना धमकावण्याचा किंवा धार्मिक तेढ करण्याचा प्रयत्न केला, तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तारच्या मेजावणीच्या वेळी बोलत होते.

मुसलमानांना आश्‍वस्त करतांना उमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तुमचा बंधू म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. जर कुणी मुसलमान बांधव आणि भगिनी यांना त्रास देण्याचा किंवा त्यांच्याकडे डोळे वटावरून पहाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सोडले जाणार नाही. आपण होळीचा सण एकत्र साजरा केला. आता गुढीपाडवा आणि ईद हेही एकत्र साजरा करू. हे सर्व सण आपल्याला एकत्र रहाण्याचाच संदेश देतात. आपण सण एकत्र साजरे करतो; कारण एकता ही आपली शक्ती आहे. मुसलमानांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. (‘हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’, असे शासनकर्ते केव्हा बोलणार ? कि हिंदू त्यांची मतपेढी नाही म्हणून दुर्लक्ष करणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारतात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, सण सुरळीतपणे पार पडल्या, असे कधी होत नाही. धर्मांध मुसलमानांकडून मशिदीतून त्यांवर आक्रमणे होणे, दगडफेक करणे, त्या काळात दंगली घडवणे असे प्रकार सर्रास घडतात; मात्र तेव्हा हिंदूंच्या बाजूने अजित पवार आणि अन्य कुणी असे का बोलत नाहीत ?
  • नागपूर येथे धर्मांध मुसलमानांनी पोलिसांवर आणि हिंदूंवर आक्रमण केले, त्यांनाही अजित पवार आश्‍वस्त करत आहेत का ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात येतो !