
नवी मुंबई – प्रभाग क्रमांक ७५ शिवसेना शाखेच्या वतीने सानपाडा येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवासेना संपर्कप्रमुख बेलापूर विधानसभा भावेश पाटील यांनी दिली. २३ मार्च या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका शाळा क्र. १८, सेक्टर ५, सानपाडा येथे हे शिबिर होईल. एकनाथ हिरक आरोग्य वर्ष आणि ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले आहे.
या शिबिरात नेत्र तपासणी आणि विनामूल्य चष्मा वाटप, दंत तपासणी आणि उपचार, रक्तदाब, रक्तातील साखर आणि ईसीजी पडताळणी, विनामूल्य औषधे आणि आधुनिक वैद्यांचा सल्ला, स्तन आणि गर्भाशय कर्करोग तपासणी, रक्तदान शिबिर, फिजिओथेरपी – सांधेदुखी, पाठदुखी, स्नायूंच्या तक्रारींवर उपचार करण्यात येणार आहेत.