
नागपूर – नागपूर येथे मुसलमानांनी केलेल्या दंगलीच्या पोलिसांनी ‘मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षा’चे कार्याध्यक्ष हमीद इंजिनिअर आणि महंमद शहजाद खान यांना अटक केली आहे. सामाजिक माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने कथानके पसरवून हा हिंसाचार घडवला गेला. या प्रकरणी ज्या सामाजिक माध्यमांद्वारे खोटी माहिती पसरवण्यात आली, त्यांची ओळख पटवून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या प्रकरणी आरंभी १४ जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत अटक केलेल्यांची एकूण संख्या १०५ वर पोचली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये १० अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. (हे अल्पवयीन मदरशांत शिकत होते का ? याचाही शोध घेतला पाहिजे ! – संपादक)

(म्हणे) ‘बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दंगल घडवली !’ – हमीद इंजिनिअर
या अगोदर पक्षाचा शहराध्यक्ष फहीम खान याला अटक झालेली असतांना त्या संदर्भात हमीद इंजिनिअर याने अटक होण्याच्या अगोदर एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले की, या दंगलीत आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. सायंकाळी ७.३० वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोंडावर मुखपट्टी (मास्क) बांधून दगडफेक केली त्यामुळे दंगल भडकली. (चोराच्या उलट्या बोंबा अशा वृत्तीचा हमीद इंजिनिअर ! दंगल धर्मांध मुसलमानांनी केली हे स्पष्ट असतांना आणि पक्षाच्या शहराध्यक्षाला मुख्य सूत्रधार म्हणून अटक झाल्यावरही धादांत खोटे बोलणारे हमीद इंजिनिअर याच्यावर आता सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! त्याच्या पक्षावरही बंदी घालणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा दंगलखोर पक्षावर केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे ! यासाठी हिंदूंना मागणी करावी लागू नये ! |