
ठाणे, २२ मार्च (वार्ता.) – तक्रारदारावर ७ लाख रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी दंडात्मक करण्यात आली होती. ही कारवाई न करण्यासाठी डहाणू उपविभागातील आशागड शाखेचे कनिष्ठ अभियंता अतुल आव्हाड (वय ४२ वर्षे) यांनी ३ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. या प्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून २ लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)