भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकरांचा प्रश्न

मुंबई – वाहन कर वाढवून संभाव्यतः अतिरिक्त महसूल निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत मांडले आणि ते संमतही झाले. या वेळी भाजपचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबई पुण्यासारख्या शहरात गाड्यांचे प्रमाण वाढल्याने चालण्याची अडचण आहे. जुन्या गाड्या स्क्रॅप करणे आणि नवीन गाड्यांविषयी मर्यादा आणता येईल का ?
याविषयी सरकार विचार करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. या विधेयकावर विधान परिषदेत चालू असलेल्या चर्चेत सहभाग घेत दरेकर म्हणाले की, ३० लाख रुपयांच्या वर ज्या गाड्या आहेत त्यावर कर वाढवण्याचा हा विषय आहे. आज एकेका व्यक्तीकडे १०-१० गाड्या असतात. १० गाड्यांची आवश्यकता काय आहे ? रस्त्यावर पार्किंग केल्याने सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो.
संपादकीय भूमिका :असा प्रश्न का उपस्थित करावा लागतो ? शासनाने याचा विचार अगोदरच करून त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित आहे ! |