
सातारा, ५ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता असल्याने ‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार व्हायलाच हवा आणि त्यासाठी माझा पाठिंबा आहे, असे ठाम मत सातारा येथील भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी त्यांना याविषयाचे निवेदन दिल्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले. या प्रसंगी माजी नगरसेविका सौ. लीला निंबाळकर आणि सनातन संस्थेचे श्री. सुरेश पंडित उपस्थित होते.