
पणजी, २२ मार्च (वार्ता.) – पॅराग्लायडिंग ऑपरेशन आस्थापनाचे मालक शेखर रायझादा यांच्याशी संबंधित एक धारिका पर्यटन खात्याच्या कार्यालयातून गायब झाली आहे. धारिका गायब झाल्याच्या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आला आहे. ही माहिती पर्यटन विभागाच्या उपसंचालकांनी पर्रा येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या पत्राला उत्तरादाखल दिली आहे. चालू वर्षी जानेवारी मासात रायझादा यांच्या आस्थापनाच्या अंतर्गत पॅराग्लायडिंग करतांना एक २७ वर्षीय महिला पर्यटक आणि त्यांचा प्रशिक्षक दरीत कोसळून दोघांचाही मृत्यू झाला होता. मांद्रे पोलिसांनी या प्रकरणात रायझादा यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे, तसेच वैध प्रमाणपत्राविना पॅराग्लायडिंग व्यवसाय केल्याबद्दल त्यांना १ लाख रुपये रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या उपसंचालकांनी उत्तरात नमूद केली आहे.
केरी समुद्रकिनार्यावर अनुज्ञप्ती नसतांना पॅराग्लायडिंग केल्याच्या प्रकरणी ८ पर्यटक कह्यात
तेरेखोल किनारी सुरक्षा पोलिसांनी केरी समुद्रकिनार्यावर अनुज्ञप्ती नसतांना पॅराग्लायडिंग केल्याच्या प्रकरणी पुणे आणि मुंबई येथील ८ पर्यटकांना २२ मार्च या दिवशी दुपारी कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकाहा भोंगळ कारभार कि भ्रष्टाचार ? |