सुश्री (कु.) छाया आर्. गौतम या मथुरा (उत्तरप्रदेश) येथील आहेत. त्या हिंदु महासभा, मथुरा शाखेच्या जिल्हाध्यक्ष आहेत. मथुरेत आरंभ झालेल्या ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी जलाभिषेक’ अभियानाच्या त्या प्रणेत्या आहेत. सनातन धर्मावर होणार्या आघातांचा त्या विरांगना बनून ब्रजभूमीत जोरदार प्रतिकार करत आहेत. ‘लव्ह जिहाद’, ‘भूमी जिहाद’, ‘गोरक्षण’ यांसाठी कार्य करत असतांना त्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी लढा देण्यासह जनजागृती करत आहेत. लव्ह जिहादच्या विरोधात कार्य करत असतांना त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांना आलेले अनुभव येथे दिले आहेत.
१. अल्पवयीन हिंदु मुलीला घेऊन मुसलमान तरुण पसार
गेल्या १३ वर्षांपासून अल्पवयीन मुलींना २५ वर्षांचे मुसलमान तरुण सामाजिक माध्यमांद्वारे जाळ्यात अडकवतात. मुसलमान तरुण त्यांना भुरळ पडणारी खोटी स्वप्ने दाखवतात. त्यानंतर त्यांना पळवून घेऊन जातात. त्यानंतरही या तरुणांना काहीच शिक्षा होत नाही. ते जुजबी २-४ महिने कैदेत घालवतात. बाहेर आल्यावर परत त्यांच्या ‘लव्ह जिहाद अभियाना’त सहभागी होतात. या कामासाठी त्यांच्या संघटना त्यांना आर्थिक साहाय्य करतात.

माझ्या जिल्ह्यात १३ वर्षांच्या उच्चवर्णीय मुलीला २५ वर्षांच्या मुसलमान मुलाने पळवून नेले. प्रथम त्याने तिला ‘इन्स्टाग्राम’वर २-४ दिवस संदेश पाठवले. १२-१३ वर्षांच्या मुलींची विचार करण्याची फार क्षमता नसते. त्यामुळे त्यांना दाखवलेली स्वप्ने खरी वाटतात. ही मुलगी एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. तो मुसलमान मुलगा सकाळी तिला भेटायला आला. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून थेट हॉॅटेलमध्ये घेऊन गेला.
२. मुसलमानाच्या तावडीतून हिंदु मुलीची सुटका
मथुरा जिल्ह्यातील असे एकही गाव आणि शहर नाही, जेथे माझ्या संघटनेचे कार्यकर्ते नाहीत. एक दिवस सकाळी ७ वाजता माझ्या संघटनेतील एका व्यक्तीचा मला दूरभाष आला. तिने १३ वर्षांच्या मुलीला मुसलमान मुलगा घेऊन जात असल्याचे मला कळवले. मी तिला आधी पोलिसांना कळवायला सांगितले. तिला पोलिसांकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिला सांगितले, ‘तू सर्वप्रथम त्या हॉटेलचे दार वाजव आणि मुलीला बाहेर काढ.’ हॉटेलच्या खाली ८ मुसलमान मुलांची टोळी उभी होती. असे असतांनाही तिने प्रयत्न करून ३ मिनिटांच्या आत मुलीला सुखरूप हॉटेलच्या बाहेर काढले. त्यानंतर तिने पोलीस प्रशासनाला सूचना दिली.
हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सशक्तीकरण ही काळाची आवश्यकता !
हिंदु जनजागृती समिती अत्यंत विशाल कार्य करत आहे. आमच्यासारख्या ज्या लहान लहान हिंदुत्वनिष्ठ संघटना सर्व ठिकाणी कार्य करत आहेत, अशा ४०० हून अधिक लहान-मोठ्या संघटनांना एकत्र बोलावून त्यांचे सशक्तीकरण केले जात आहे. ही गौरवास्पद गोष्ट असून अत्यंत आवश्यक आहे.
– सुश्री (कु.) छाया आर्. गौतम
३. पोलिसांकडून तडजोड करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न
दुपारी १२ वाजेपर्यंत कोणतेच प्रकरण नोंदवले गेले नाही. त्यानंतर मुलीचे आई-वडील, मुसलमान पक्ष आणि पोलीस यांनी मिळून हे प्रकरण आपापसांत मिटवण्याचा विचार केला. त्यात तिच्या आई-वडिलांना ४ लाख रुपये देऊ केले. ‘२ लाख रुपये पोलीस घेऊन जातील आणि या संघटनेचे ४-५ लोक होते, त्यांनाही १ लाख देऊन प्रकरण मिटवू’, असे त्यांनी ठरवले.
याविषयी दुपारी १२ वाजता मला समजले की, काहीतरी षड्यंत्र रचले जात आहे. मी गाडी घेऊन ४० कि.मी. अंतरावर गेले. पोलीस त्यांना उपदेश देत होते, ‘लव्ह जिहादच्या यंत्रणेविरुद्ध लढा देणे किती कठीण कार्य आहे. तुमची मुलगी अल्पवयीन आहे. तुम्ही आता तक्रार केली आणि खटला चालवला, तर तुमच्या मुलीची समाजात मानहानी होईल. त्यामुळे तिच्या लग्नात अडचणी येतील. तुमच्या मुलीशी काही अपप्रकारही घडला नाही. त्यामुळे तुम्ही हे प्रकरण आपापसांत मिटवून टाका.’ त्यावर तिचे आई-वडील संतुष्ट झाले. ते गरीब कुटुंबातील; पण उच्च वर्णातील होते. ‘२-४ लाख रुपये मिळाले, तर संसाराला हातभार लागेल’, असा विचार त्यांनी केला होता.
४. अखेर पोलिसांकडून मुसलमान मुलाला अटक
पोलीस हे प्रकरण नोंदवत नाही, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी त्या मुलीच्या पालकांना म्हटले, ‘मी तुम्हा दोघांना कारागृहात पाठवू शकते आणि या मुसलमान मुलालाही कारागृहाची हवा खावी लागेल. हा माझा मूलभूत अधिकार आहे. वास्तविक तुमची मुलगी कुठे जाते ?, ती कुणाशी बोलते ?, ती सामाजिक माध्यमांवर काय काय करत आहे ?, हे तुम्हाला ठाऊक नाही. असे असतांनाही आम्ही हिंदुत्वनिष्ठ तिचे रक्षण करत आहोत आणि तुम्ही थेट त्या मुसलमानांशी तडजोड करत आहात, याचा अर्थ काय ?’ त्यानंतर कुठे त्या मुलीच्या वडिलांना काहीतरी मनातून वाटले. माझी संघटना मोठी असल्यामुळे आम्हाला पोलीस खाते आणि सर्व मुसलमान तरुण वचकून होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवली आणि त्यात त्या मुसलमान तरुणाचे नावही अंतर्भूत केले. यासमवेतच माझे आणि माझ्या संघटनेचे नावही त्यात लिहायला लावले. अन्यथा पुढे असे घडते की, मुसलमान तरुण कारागृहात १-२ महिने घालवतात आणि न्यायालयात जाऊन साक्ष देऊन मोकळे होतात. आता त्या दोघांनाही कारागृहात बसावे लागले आहे.
लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मुलींना धर्मशिक्षण देणे आवश्यक !
आपण विचार करतो की, कायद्याने लव्ह जिहाद थांबवता येईल; पण मला तसे वाटत नाही. आपले भारतीय संस्कार आणि हिंदु संस्कृती जेव्हा घराघरांत बहरून येईल, त्या दिवशी लव्ह जिहाद आपोआप थांबेल. आपल्या मुली प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, हिंदी चित्रपट यांच्या अधीन झालेल्या असतात; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. त्यामुळे मुलींवर बळजोरी करावी लागली, तरी त्यांना चांगले संस्कार शिकवा. आपण आपल्या लहान मुलींना बालवयातच गीता शिकवली पाहिजे. त्यात श्रीकृष्णाने म्हटले आहे, ‘स्वधर्म नेहमी आपले हितच करतो आणि परधर्म आपल्याला नेहमी नाशाकडेच घेऊन जातो.’ जेव्हा या गोष्टी आपल्या मुली शिकतील, तेव्हा ‘लव्ह जिहाद’ समूळ नष्ट होईल. ‘लव्ह जिहाद’ आपले भारतीय संस्कार आणि हिंदु संस्कृती यांच्या अभावामुळे वाढत आहे. सनातन धर्मापेक्षा सामर्थ्यशाली कोणताच धर्म नाही.
या गोष्टींची जाणीव आपल्या मुलांना करून दिली, तर त्या कोणत्याही जाळ्यात अडकल्या जाणार नाहीत, त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यामुळे माझ्या संघटनेच्या साहाय्याची कुणाला आवश्यकताच पडणार नाही, असे मला वाटते. आपला हिंदु धर्म एवढ्या उच्च विचारसरणीचा असूनही आपल्या मुली असा दुराचार करतात आणि फसतात, ही आपल्या हिंदूंना अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या भूमीवर भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला, अशा भूमीत माझा जन्म झाला आहे आणि याच भूमीवर हा सर्व स्वैराचार घडत आहे, ते पाहून केवळ माझे मनच आतून क्रंदन करत नाही, तर माझा आत्माही आक्रोश करत आहे.’
– सुश्री (कु.) छाया आर्. गौतम
५. उत्तरप्रदेशातील लव्ह जिहादविरोधी कायद्याविषयी हिंदुत्वनिष्ठ आणि पोलीस यांची अनभिज्ञता
‘उत्तरप्रदेशामध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला. प्रत्यक्षात लव्ह जिहादविरोधी कायदाच लोकांना ठाऊक नव्हता. लव्ह जिहादसाठी कोणते कलम आहे ? हेही त्यांना ठाऊक नव्हते. अशा प्रकरणात जेव्हा गुन्हा नोंद होतो, तेव्हा पोलीस कलम ३५४ लावतात. मुलगी अल्पवयीन असली, तर कलम ३७६ लावतात. त्याहून अधिक काही करत नाहीत. उत्तरप्रदेशामध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा बनवला. तो बनवून अनेक वर्षे होऊन गेली; परंतु लव्ह जिहादचा एकही खटला भरला गेला नव्हता. जेव्हा मी ही तक्रार नोंदवली, तेव्हा मी सांगितले की, यात लव्ह जिहादचे कलम घातले पाहिजे.
त्या वेळी आमच्या लक्षात आले की, मुख्य पोलीस अधिकार्यांपासून खालपर्यंतच्या पोलिसांना लव्ह जिहादसाठी कोणते कलम लावायचे, हेच ठाऊक नव्हते. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय येथील अधिवक्त्यांना दूरभाष केले. तेथील अधिवक्त्यांनी सर्व कायदेशीर भाग सांगून लव्ह जिहादचे कलम सांगितले. त्यानंतर उत्तरप्रदेशामध्ये पहिला खटला भरला, ज्यात प्रथमच लव्ह जिहादचे कलम लागू करण्यात आले.
६. लव्ह जिहादच्या तावडीतून ५० हिंदु मुलींची सुटका !
मी एका विद्यालयात मुख्याध्यापिका आहे. शाळेचे काम करत असतांनाच मी गोवंश रक्षणासासह ‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठीही कार्य करते. त्यामुळे सकाळी ७ वाजता चालू झालेला दिवस रात्री २ वाजता कसा संपला, हे मला कळतही नाही. आम्ही आपला देश आणि हिंदु धर्म वाचवण्यासाठी कार्य करत आहोत. मथुरेत किंवा त्या परिसरातील कोणत्याही हिंदु मुलीला मुसलमान तरुण फूस लावून पळवून नेत असेल, तर पोलीस खाते आम्हाला साहाय्य करते. सज्ञान नसलेल्या मुली असाहाय्य असल्याने त्यांना आम्हाला साहाय्य करावेच लागते. आम्ही मुलीला शोधून आणतो आणि पोलिसांच्या स्वाधीन करतो. रात्री उशिरा मुलीचे पालक आणि पोलीस यांचा मला दूरभाष येतो की, मुलीचे समुपदेशन करावे लागणार आहे; कारण मुलगी गुन्हा घडल्याचे मान्यच करत नाही. माझा असा अनुभव आहे की, मी आजपर्यंत ४० ते ५० मुलींचे समुपदेशन केले आणि यशस्वी होऊनच परत आले. केवळ मथुरा जिल्ह्यातील मुलींचे नाही, तर मी देहलीपर्यंतच्या मुलींचे भ्रमणभाषच्या माध्यमातून समुपदेशन केले. सुदैवाने मला कधी नकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलींना समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते.
– सुश्री (कु.) छाया आर्. गौतम, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा (मथुरा), उत्तरप्रदेश.