नागपूर दंगलीत बांगलादेशी घुसखोर आणि आतंकवादी संघटनांचे संबंध पडताळण्यासाठी ‘एन्.आय.ए.’कडून अन्वेषण करा ! – सकल हिंदु समाजाचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – नागपूर दंगलीतील दोषींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करा, दंगलखोरांकडून जाळपोळ आणि तोडफोडीची हानीभरपाई करा, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी अधिक अधिकार द्या आणि साधने द्या, तसेच नागपूर दंगलीत बांगलादेशी घुसखोर अन् आतंकवादी संघटनांचे संबंध पडताळण्यासाठी ‘एन्.आय.ए.’कडून अन्वेषण करा, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे २१ मार्चला आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हापुख श्री. उदय भोसले, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. विकास जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शीलाताई माने, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु महासभा जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. सतीश मांगले, ‘ऋण मातृभूमी’चे श्री. सौरभ निकम, हिंदुत्वनिष्ठ संभाजी साळुंखे, ‘ओम कालीसेने’चे जिल्हाध्यक्ष श्री. विशाल पाटील यांसह अन्य उपस्थित होते.