विधानसभेत ठराव होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही ! – आंदोलकांची भूमिका

जोपर्यंत विधानसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांविरोधात ठराव संमत करण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका नागपाडा येथील आंदोलकांनी घेतली आहे. हे आंदोलन २६ जानेवारीपासून चालू असून आंदोलनाला २० दिवस पूर्ण झाले आहेत.

ठाणे येथे गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निर्णय घेतला आहे. याचा निषेध करण्यासाठी १४ फेब्रुवारी या दिवशी येथील प्रभात चित्रपटगृहाच्या जवळील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.