डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे जगातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी १४ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.