Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्

प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत आणि वैज्ञानिक डॉ. आनंद रंगनाथन् यांचे रोखठोक वक्तव्य

मुसलमानांकडून वक्फ कायद्यातील सुधारणांविरुद्ध करण्यात येणार्‍या हिंसक आंदोलनांवरून वक्तव्य !

डॉ. आनंद रंगनाथन्

नवी देहली – वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या. अशा काळ्या, अत्याचारी, अन्याय्यपूर्ण कायद्यांमध्ये पालट नको, तर ते रहितच केले गेले पाहिजेत. वक्फ कायद्यात पालट करू नका, तर तो रहितच करा, असे रोखठोक वक्तव्य प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत आणि वैज्ञानिक डॉ. आनंद रंगनाथन् यांनी केले. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते. ‘माझा वक्फ बोर्डाला विरोध नाही, तर त्याच्या कायद्याला आहे. असंख्य बोर्ड आणि स्वयंसेवी संस्था आहेत, तसाच वक्फ बोर्ड आहे’, असेही रंगनाथन् यांनी स्पष्ट केले.

डॉ. रंगनाथन् पुढे म्हणाले की,

१. शाहीनबागचे भयावह आंदोलन आठवा !

प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असला, तरी एखादी गोष्ट थांबवण्याचा अधिकार कुणालाही नाही. शाहीनबाग येथे झालेले आंदोलन आठवा. द्वेषपूर्ण धर्मांधांनी अवैधरित्या तेथील रस्ते रोखून लाखो लोकांची गैरसोय केली होती. त्यामागे त्यांच्याकडे कोणतेही तार्किक कारण नव्हते. केवळ शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी तसे केले आणि त्या वेळी घोषणा काय दिल्या, तर ‘तेरा-मेरा रिश्ता क्या ला-इलाला-इल्ललाह’ (केवळ अल्लाच देव आहे, अन्य कुणीही नाही); ‘हिन्दुओं से आजादी’, ‘काफिरों से आजादी’, ‘हम लेकर रहेंगे जिन्ना वाली आजादी’, ‘हिन्दुत्व की कबर खुदेगी’ ?

२. जर पुन्हा ‘शाहीनबाग’सारखे आंदोलन झाले, तर त्यास सर्वस्वी केंद्र सरकारच उत्तरदायी असेल !

वक्फ कायद्यातील सुधारणांविरुद्ध मुसलमान हे शाहीनबागसारखे आंदोलन करण्याची धमकी देत आहेत; परंतु मी त्यांना दोष देणार नाही. मी यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनाच उत्तरदायी धरीन. पहिल्या वेळी (वर्ष २०२० मध्ये) ते शाहीनबागमधील आंदोलन थांबवण्यात अपयशी ठरले. आता जर ते पुन्हा अपयशी ठरले, तर आपण हे स्वीकारले पाहिजे की, आपण एक दुबळा देश आहोत, जो रस्त्यावर उतरलेल्या समुदायाच्या विरोधासमोर (‘स्ट्रीट व्हीटो’समोर) नमतो.

३. राष्ट्रध्वजातील अशोक चक्राच्या ठिकाणी इस्लामी प्रतिज्ञा लिहिल्याचे आठवा !

वर्ष २०२० मध्ये मुसलमानांनी तेलंगाणात झालेल्या आंदोलनात राष्ट्रध्वजातील अशोक चक्राच्या ठिकाणी ‘शहादा’ लिहिलेले आठवते का तुम्हाला ? (शहादा ही इस्लामी प्रतिज्ञा आहे, ज्यामध्ये केवळ अल्लावरच श्रद्धा ठेवण्यास सांगण्यात आले आहे.) लहान मुलांनी ‘आम्ही मोदी आणि शहा यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारू’, असे म्हटल्याचे आठवते का तुम्हाला ?

४. संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप ‘एक देश’ म्हणून वक्फच्या अधिपत्याखाली येईल !

वक्फ कायद्याच्या नावाखाली आधी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे मंदिर, नंतर बिहारमधील एक संपूर्ण गाव, नंतर भारताची संसद, नंतर विजयपूर (कर्नाटक) येथील अनेक एकर क्षेत्र, कन्नूर येथील क्षेत्र, केरळमधील ख्रिस्त्यांची ४०० एकर भूमी, नंतर महाकुंभमेळ्यातील पवित्र भूमी, या सर्वांवर वक्फ बोर्डाने दावा केला. तो दिवस दूर नाही, जेव्हा पेशावरपासून प्लासीपर्यंत संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप ‘एक देश’ म्हणून वक्फच्या अधिपत्याखाली येईल. हे सर्व अत्यंत विचित्र आहे.

… तर २४ तासांत हे (मुसलमान) सुतासारखे सरळ होतील !

या वेळी डॉ. रंगनाथन् म्हणाले की, जगभरात भूमीशी निगडित वाद हे धार्मिक समुदायनिरपेक्ष कायद्यांद्वारे सोडवले जातात. मग भारतात एक धार्मिक समुदाय एका वेगळ्या कायद्याच्या आडून दुसर्‍या धार्मिक समुदायावर अन्याय-अत्याचार करत असणे, हे कसे स्वीकारता येईल ? हा एक गुन्हाच आहे. हिंदूंसाठी वक्फ कायद्यासारखा एखादा कायदा आहे का ? तसा एक कायदा बनवाच. ज्यांना वक्फ कायदा ‘जसा आहे, तसा’ हवा आहे, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हिंदू देशभरातील सहस्रो मशिदी, मुसलमान गावे यांच्यावर दावा करतील. तसेच ते या भूमींवर न्यायालयांद्वारे नाही, तर वक्फसारख्या हिंदु कायद्यामुळे नियंत्रणही मिळवतील. असे झाले, तर लक्षात ठेवा, हे (मुसलमान) २४ तासांत सुतासारखे सरळ होतील.