कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध विधान परिषदेत हक्कभंग

भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कामरा आणि अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव प्रविष्ट केला.

आमदार आदित्य ठाकरे यांनी नैतिकता म्हणून त्यागपत्र द्यावे ! – संजय गायकवाड, आमदार, शिवसेना

दिशा सालियान हत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी २५ मार्चला पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तिच्या वडिलांनी दिशाच्या हत्येमध्ये विधानसभेचे सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली आहे.

पानिपतची लढाई मराठ्यांच्या पराभवाची नव्हे, शौर्याची लढाई ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या ऐतिहासिक लढाईतील त्याग आणि शौर्य यांची आठवण म्हणून पानिपतच्या काला आंब परिसरात भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

नागपूर दंगलीमागे बांगलादेश आणि मालेगाव येथील संबंध ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

२६ मार्च या दिवशी अंतिम आठवडा चर्चेला विधान परिषदेत उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड !

राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्च पदावर पोचू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अवैध हुक्का पार्लर चालवणार्‍या उपाहारगृहाचा परवाना कायमचा रहित करणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

अशी माहिती गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य सुनील कांबळे यांनी पुणे येथील अवैध हुक्का पार्लरविषयी हा तारांकित प्रश्न विचारला होता.

मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हात ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

या प्रकरणात खासदार सौ. सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे आरोपींच्या संपर्कात होते. या प्रकरणाच्या विरोधात सिद्ध केलेले व्हिडिओ आधी सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत

कुणाल कामरासारखी विकृती ठेचली पाहिजे ! – उदय सामंत, मंत्री

कुणालचा बोलविता धनी शोधायला हवा. ज्या पद्धतीने बोलले गेले, ती विकृती आहे. ती विकृती आपण ठेचली पाहिजे, असे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केले.

नवीन वाहनांच्या खरेदीवर शासन मर्यादा ठेवणार का ?

असा प्रश्न का उपस्थित करावा लागतो ? शासनाने याचा विचार अगोदरच करून त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !

राज्यातील औद्योगिक क्षेत्रांतील समस्यांविषयी १५ दिवसांमध्ये बैठक

अमरावती औद्योगिक क्षेत्रांमध्ये महामंडळाकडून ६०६ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ५२४ भूखंडावर उद्योग उभारले आहेत. सध्या २० भूखंड मोकळे आहेत.