शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी मविआचे आंदोलन

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी १२ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. ‘कंत्राटदार तुपाशी, शेतकरी उपाशी’, ‘निवडणूक सरली, कर्जमाफी विसरली’, अशा घोषणा देण्यात आल्या. ‘महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यांना शेतकर्‍यांचा विसर पडला आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीविषयी कोणतीही घोषणा सरकारने केली नाही’, असा आरोप या वेळी आमदारांनी केला.