
जयपूर (राजस्थान) : येथील प्रतापनगरमध्ये असणार्या महिला पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तत्कालीन प्राचार्य सय्यद मशकूर अली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी म्हटले की, प्राचार्य विद्यार्थिनींना त्यांच्यासमवेत झोपण्यासाठी दबाव आणत असत. जर मुलींनी त्यांचे ऐकले नाही, तर महाविद्यालयातून काढून टाकू, अशी धमकीही त्यांनी दिली होती. ते म्हणायचे की, ते मुलींचा पुरवठाही करतात.
१. या संदर्भात विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली होती. यानंतर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. तपासात दोषी आढळल्यानंतर मशकूर यांना निलंबित करण्यात आले. तथापि मशकूर यांनी स्वतःला निर्दोष असल्याचा दावा केला. यानंतर १० मार्च या दिवशी पुन्हा चौकशी समिती महाविद्यालयात चौकशीसाठी पोचली. त्याला विद्यार्थिनींनी विरोध केला. मशकूर अली यांना वाचवण्यासाठी पुन्हा चौकशी केली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
२. विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, सय्यद मशकूर अली यांची वर्ष २०२३ मध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ते विद्यार्थिनींशी गैरवर्तन करू लागले.
३. मशकूर यांनी स्वतःला विद्यार्थिनींच्या वैयक्तिक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले आहे. ते मुलींना अश्लील संदेशही पाठवत होते. ते खोटे कारण सांगून विद्यार्थिनींना त्यांच्या गाडीत घेऊन जायचे आणि चालत्या गाडीत त्यांच्याशी गैरवर्तन करायचे.
४. विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की, मशकूर अली धमकी देत होते की, जर कुणी पोलिसांकडे किंवा त्यांच्या नातेवाइकांकडे तक्रार केली, तर ते त्यांचा व्हिडिओ प्रसारित करतील.
५. या भीतीमुळे कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली नव्हती. नंतर मात्र विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांनी मशकूर अली यांच्या विरुद्ध महिला आयोग, मुख्यमंत्री आणि राजस्थान संपर्क पोर्टल यांच्याकडे तक्रार केली.
संपादकीय भूमिका
|