काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारवर टीका !

मुंबई – या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील योजना, प्रकल्प यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला आहे, अशी टीका विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अर्थसंकल्प झाल्यावर महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायर्यांवर महायुती सरकार विरोधात आंदोलन केले.