केरळ उच्च न्यायालयात अधिवक्त्यांचे आंदोलन
तिरुवनंतपूरम (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. बदरुद्दीन यांनी महिला अधिवक्त्याविषयी अपमानास्पद विधान केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात आंदोलन केले. विधवा महिला अधिवक्त्याविषयी केलेल्या टिपणीविषयी न्यायमूर्तीनी क्षमा मागावी, अशी मागणी केरळ ‘हायकोर्ट ॲड्व्होकेट्स असोसिएशन’ने केली.
न्यायमूर्तींनी क्षमा मागितली नाही, तर सभा घेऊन त्यांच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी आंदोलक अधिवक्त्यांनी दिली आहे.
न्यायमूर्तीनी त्यांच्या चेंबरमध्ये क्षमा मागण्याची इच्छा व्यक्त केली आहे; मात्र त्यांनी सर्वांसमोर न्यायालयात क्षमा मागावी, असे ‘हायकोर्ट ॲड्व्होकेट्स असोसिएशन’चे अध्यक्ष नंदकुमार एम्. आर्. यांनी म्हटले आहे. न्यायमूर्तीनी त्यांच्या चेंबरमध्ये क्षमा मागण्याची इच्छा व्यक्त केली आहे; मात्र त्यांनी सर्वांसमोर न्यायालयात क्षमा मागावी, असे ‘हायकोर्ट ॲड्व्होकेट्स असोसिएशन’चे अध्यक्ष नंदकुमार एम्. आर्. यांनी म्हटले आहे.