धर्मावरील आघातांविरुद्ध सांगलीत १० सहस्र हिंदूंची सिंहगर्जना !

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन अन् सामाजिक तेढ यांच्या विरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी सांगलीत २४ डिसेंबरला भव्य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ काढण्यात आला.

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

इतके अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यातील उत्तरदायींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे !

जगातील ५०० प्रभावशाली मुसलमानांच्या सूचीमध्ये भारतातील झाकीर नाईकचे नाव !

भारतातून पलायन कराव्या लागलेला झाकीर नाईक यासह भारतातील एकूण ५० मुसलमानांचा यात समावेश !

देशात वर्ष २०१७ ते २०२१ या वर्षांत १ लाख ९६ सहस्र सायबर गुन्हे

भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली !

चीनमध्ये कोरोनाबाधितांना रस्त्यावर खांबांना दोरी बांधून दिले जात आहे सलाईन !

चीनमध्ये मृतदेह कंटेनरमध्ये गोळा केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोक स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लावून वाहनांमध्ये मृतदेह घेऊन उभे आहेत.

अद्वितीय हिंदु धर्म !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सानिया बनणार देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ वैमानिक !

येथील सानिया या देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ (फायटर) वैमानिक बनणार आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २७ डिसेंबर २०२२ या दिवशी त्या लढाऊ वैमानिक म्हणून पहिले उड्डाण करतील.

नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर पुणे महापालिका केवळ १० कृत्रिम झाडे भाड्याने घेणार !

सतर्कतेने महापालिकेच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणार्‍या नागरिकांचे अभिनंदन ! प्रशासनाचा कारभार पहाता नागरिकांनी नेहमीच सतर्क राहून अयोग्य कृतींना विरोध करणे आवश्यक आहे !

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !