हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी  ‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.

‘कोरोना’च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल गठीत ! – देवेंद्र फडणवीस

कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्यशासन लक्ष ठेवून आहे. चीनसह अन्य काही देशांत या रोगाचे रुग्ण पुन्हा आढळत आहेत; म्हणून राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारसमवेत समन्वय ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले.

आम्ही क्लब चालवतो, डान्स बार नव्हे : सतावणूक बंद करा ! – कळंगुट (गोवा) येथील क्लबचे चालक

राज्यात अवैध व्यवहार फोफावत असल्याने  त्याविरोधात जनता, व्यावसायिक, प्रशासन आणि सरकार यांनी राज्यहितासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे !

छायाचित्रांच्या ‘मॉर्फिंग’ प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील शासकीय कार्यालयात काम करणार्‍या महिलांची ‘मॉर्फिंग’ (चेहर्‍याचे विद्रूपीकरण करून सामाजिक माध्यमांवर चित्र प्रसारित करणे) केलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात येईल, तर पोलीस निरीक्षकाचे स्थानांतर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले. … Read more

गोव्यात डान्स बार नाहीत, अवैधपणे डान्स बार चालवत असल्यास पोलिसांना संपर्क करा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कुणीही अवैधपणे डान्स बार चालवत असल्यास त्याविषयी स्वत: कायदा हातात न घेता त्याविषयी पोलिसांकडे ‘१००’ किंवा ‘११२’ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

भोसरी (पुणे) येथे ‘कामधेनू महोत्सवा’स उत्साही वातावरणात प्रारंभ !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘जनमित्र सेवा संघ’ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने आयोजित ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’स उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाच्या १३ वर्षांनंतरही देशांतील बंदरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा ! – नियंत्रण आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांचे ताशेरे

असे केवळ भारतातच घडू शकते ! याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाईही होण्याची शक्यता नाही, हेही तितकेच स्पष्ट आहे !

केरळमधील पी.एफ्.आय.चे नेते इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या संपर्कात होते !

पी.एफ्.आय.च्या अशा देशद्रोही नेत्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

महाराष्ट्राला इंचभरही भूमी देणार नाही !  

राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. महाराष्ट्राला एक इंचही भूमी देणार नाही, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कर्नाटक राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात केले.

देशात पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्र सरकार

चीनमध्ये कोरोनाच्या झालेल्या उद्रेकाचा परिणाम !