देशात वर्ष २०१७ ते २०२१ या वर्षांत १ लाख ९६ सहस्र सायबर गुन्हे

कारवाई मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांवरच !

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा

नवी देहली – भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी ही माहिती दिली.

सायबर गुन्ह्याचा सामना करण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये पोलिसांना प्रशिक्षण दिले जाईल. यात न्यायाधीशही सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.