संभाजीनगर येथे १०५ जणांना गोवर !

मुंबई, भिवंडीपाठोपाठ शहरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ४ डिसेंबर या दिवशी शहरातील आकडा १०० च्या वर गेला असून गोवर झालेल्या संशयित बालकांची संख्या आता १०५ पर्यंत पोचली आहे. 

शिवरायांची वाघनखे ब्रिटनमधून आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

काही दिवसांपूर्वी लंडन येथे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार घोषित केले आहे.

श्रद्धा वालकर हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आफताब याला फाशी द्या !

देशात अनधिकृतपणे होणारे धर्मांतर आणि लव्ह जिहाद या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करावा, या मागण्यांसाठी ‘विराट मूक मोर्चा’ काढण्यात आला

कोकण रेल्वेमार्गावर भावनगर- कोचुवेल्ली रेल्वेगाडी ‘एल्.एच्.बी.’ अत्याधुुनिक डब्यांसह धावणार !

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी ‘१९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर’ या रेल्वेगाडीत आता आरामदायक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एल्.एच्.बी. (लिंक हॉफमॅन बुश) डबे (कोच) असणार आहेत.

आतंकवाद असेपर्यंत पाकशी कोणतीही चर्चा नाही ! – भारताचा पुनरूच्चार !  

आतंकवाद चालू असेपर्यंत पाकिस्तानसमवेत कोणतीही चर्चा होऊ शकत नाहीत, असा पुनरुच्चार भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी केला.

वाशीतील महिला सुलभ शौचालयाची दुरवस्था

शौचालयांच्या देखभालीचे दायित्व कंत्राटदाराकडे असतांना त्याच्याकडून ते होत नसेल, तर महापालिका कारवाई का करत नाही ? कंत्राटदाराकडून स्वच्छता होत नसेल, तर त्यावर अन्य उपाययोजना महापालिकेने आतापर्यंत का शोधली नाही ?

कॅनडामध्ये वर्ष २०२१ मध्ये १० सहस्रांहून अधिक लोकांनी घेतले इच्छामरण !

कॅनडा येथील कथित सुधारणावादी समाज आणि सरकार यांना अध्यात्मशास्त्र ज्ञात नसल्यामुळे तेथे इच्छामरणाला स्थान आहे. अशाने ते नागरिकांची आध्यात्मिक स्तरावर हाती करत आहेत !

गीतापठणातील ध्वनीलहरींच्या सकारात्मकतेचा वैज्ञानिक स्तरावर होणार अभ्यास !

संस्कृत सखी सभा, नागपूरच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमाननगर येथे आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात विक्रमी अशा ‘संपूर्ण (१८ अध्यायी) श्रीमद्भगवद्गीता पठण महावाग्यज्ञा’त अनुमाने ४ सहस्र महिलांनी एकाच वेळी गीतापठण केले.

‘नैतिक पोलीस’ (मोरॅलिटी पोलिसिंग) बंद करण्याची सरकारची घोषणा

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाला यश मिळाले आहे. इराणच्या सरकारने नैतिक पोलीसगिरी (मोरॅलिटी पोलिसिंग) बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

भागलपूर (बिहार) येथे महंमद शकील याने हिंदु महिलेची हात-पाय, कान आणि स्तन कापून केली हत्या !

भागलपूरमध्ये जिहादी महंमद शकील याने एका हिंदु महिलेची हात-पाय, कान आणि स्तन कापून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.