रस्ता रुंदीकरणासाठी घाटकोपर येथील मंदिर तोडले; मशीद हटवण्याला मात्र बगल !

एक वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी येथील राधाकृष्ण मंदिर आणि श्री साईबाबा यांचे मंदिर, तसेच येथील ताहिरा मशिद अन् हुसैनी मशीद पाडण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता; मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केला.

राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सातारा येथे भाजपच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तानचा निषेध !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावरच नव्हे, तर संपूर्ण भारतीय अस्मितेवरील आक्रमण आहे. भाजपच्या वतीने झरदारी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत शहरातील शिवतीर्थावर आंदोलन केले

जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदना संपली असून ‘ईडी’ सरकारमध्ये असलेला विसंवाद प्रतिदिन दिसतो. राज्याप्रती मुख्यमंत्र्यांची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात आला आहे..

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या करमणुकीसाठी डिजिटल थिएटर उभारले !

अधिवेशाचा वेळ बहुमूल्य आहे. सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर आणि जनतेचे सहस्रो प्रश्न प्रलंबित असतांना एकत्रित बसून समोरासमोर चर्चा करून सोडवण्याऐवजी अधिवेशनातील वेळ मनोरंजनासाठी देणे, हे संतापजनक आहे. जनतेच्या कराच्या पैशातून चालणार्‍या अधिवेशनाच्या कालावधीत असा विचार करणारे…

विधीमंडळ अधिवेशन वादळी होण्याची शक्यता !

यंदाच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांचा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलेला अवमान, कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून झालेला वाद आणि राज्यभर लव्ह जिहादच्या विरोधात निघणारे..

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे आंदोलन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच भारताचा अनादर करणाऱ्या पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या विरोधात भाजपद्वारे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

राज्यात नवीन लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांनाही आणणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यात नवीन लोकायुक्त कायदा करणार आहे. या कायद्यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांचाही समावेश करण्यात येणार आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी पोलीसदल स्थापन करा !

वास्तविक अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना करावी लागू नये. सरकारने स्वतःहून यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

आय.एन्.एस्. मुरगाव भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू !

‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ येथे बांधण्यात आलेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आय.एन्.एस्. मुरगाव ही दुसरी युद्धनौका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे.