ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमण हटवण्याची लिंगायत संघटनांची मागणी !

महापालिका प्रशासनाला ड्रेनेजचे पाणी आणि अतिक्रमण दिसत नाही का ? ‘प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !

संभाजीनगर येथील श्री स्मशान हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

येथील श्री स्मशान हनुमान मंदिर संस्थान, संजयनगर येथे १७ ते २४ डिसेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ समाजातील प्रत्येकापर्यंत जायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संतोष देसाई यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांना हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला.

भोसरी (पुणे) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद’ !

महोत्सवामध्ये शोभायात्रा, कामधेनू यज्ञ आणि सप्तधेनू परिक्रमा !

आसाराम बापूंच्या अनुयायांकडून पुण्यात ‘भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा’ !

२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात, त्याला पर्याय म्हणून मानव कल्याणासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून वर्ष २०१४ पासून २५ डिसेंबर हा ‘तुलसी पूजन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत जोतिबा डोंगर परिसरात पार पडला. ‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला.

नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा ! – तासगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात राजकीय दबाव असल्याची शंका येते ! – आमदार आशिष शेलार, भाजप

श्रद्धा वालकर हिने केलेल्या तक्रारीमध्ये २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी स्वत:ला मारहाण झाली असल्याचे तिने स्पष्ट लिहिले होते. असे असतांना त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? त्यामुळे हा प्रकरणात राजकीय दबाव असल्याची शंका येते, असा संशय भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

७० तुकडे करता येतील इतका आफताब नालायक ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

कोंबडीचे १० तुकडे करायचे असतील, तर १० वेळा विचार करावा लागतो. येथे एका मुलीचे ३५ तुकडे केले. कायद्यात तरतूद असती, तर याचे ३५ तुकडे करता आले असते. ७० तुकडे करता येतील, इतका हा नालायक आहे, असा तीव्र संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला.