पुणे – शहरामध्ये जानेवारीमध्ये ‘जी २०’ परिषद होणार आहे. त्याकरिता २० लाख रुपये व्यय करून १०० कृत्रिम झाडांवर विद्युत् रोषणाई करण्यात येणार होती. या महापालिकेच्या पैशांच्या उधळपट्टीला पुणेकर नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर आता रोषणाईकरिता केवळ १० झाडे घेतली जाणार असल्याने १८ लाख रुपयांची बचत होणार आहे. ‘या कृत्रिम झाडांपेक्षा खर्या झाडांचे रक्षण करा, पैशांची उधळपट्टी थांबवा’, अशी मागणी नागरिकांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली होती. त्यातून ‘केवळ १० झाडे लावा, इतर झाडे घेऊ नका’, असा आदेश आयुक्तांनी विद्युत् विभागाला दिला असल्याचे समजते.
संपादकीय भूमिकासतर्कतेने महापालिकेच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणार्या नागरिकांचे अभिनंदन ! प्रशासनाचा कारभार पहाता नागरिकांनी नेहमीच सतर्क राहून अयोग्य कृतींना विरोध करणे आवश्यक आहे ! |