कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा.

चोरीचा माल सापडलेल्या १४ दुकानांवर कारवाई !

जिल्ह्यातील शेतीची अवजारे आणि विद्युत् जनित्रामधील सुटे भाग यांच्या चोरीची प्रकरणे वाढली. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी भंगाराच्या १२४ दुकानांची पडताळणी केली. त्यात नांदगाव खंडेश्वर येथील फिरोज खान यांच्या भंगार दुकानात पोलीस तक्रारीप्रमाणे शेतीचा माल मिळाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा ८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाचे ८७ वे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे शिवप्रतापदिन साजरा !

फैजपूर, तालुका यावल येथे श्रीराम मंदिरात शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या रणरागिणी उपस्थित होत्या.

मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला राष्ट्रपतींची संमती !

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला संमती दिली आहे. यामुळे मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टवाळखोर मुले भ्रमणभाषमधून मुलींची छायाचित्रे काढतात आणि मैदानावर बाटल्यांचा खच पडतो !

मुख्याध्यापक वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष करणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. अशाने समाजात कधीतरी कायदा-सुव्यवस्थेचे राज्य येईल का ? कर्तव्यात कुचराई करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फच केले पाहिजे.

‘गूगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान

भारत माझाच भाग असून त्याला मी माझ्याजवळच ठेवतो ! – सुंदर पिचाई

मुसलमान मुलाकडून दुसर्‍या मुसलमान मुलावर चाकूने जीवघेणे आक्रमण !

मुसलमान धर्मातील हिंसक होणारी अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर आतंकवादी झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे ६ प्राध्यापक ५ दिवसांसाठी निलंबित !

अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करणेच आवश्यक आहे ! याविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, प्रत्यक्षात महाविद्यालयानेच त्यांच्याकडे लक्ष ठेवून कारवाई करणे आवश्यक होते !

युद्धसरावाशी तुमचा काही संबंध नाही !  – अमेरिकेने चीनला सुनावले !

उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे.