गोरेगाव (मुंबई) येथे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्‍याला अटक !

बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्‍या टोळीतील एका आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव परिसरातील नागरी सुविधा केंद्रावर धाड टाकून पोलिसांनी ३० हून अधिक बनावट आधारकार्ड आणि १५ बनावट पॅनकार्ड जप्त केले आहेत.

उरुळी देवाची आणि फुरसुंगी (जिल्हा पुणे) या २ गावांची स्वतंत्र नगर परिषद होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही २ गावे वगळण्यात येतील, तसेच या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगर परिषद करावी, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुढील १५ दिवसांमध्ये या संदर्भातील आदेश निघणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सातारा येथील वाढीव घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती !

नुकत्याच झालेल्या चतुर्थ वार्षिक पहाणीनंतर घरपट्टी वाढीच्या नोटिसा वाटप करण्याची प्रक्रिया नगरपालिकेच्या वतीने जवळपास पूर्ण होत आली आहे. प्रक्रिया अपील प्रविष्ट करण्याच्या टप्प्यात असतांना ती तातडीने स्थगित करण्याचे निर्देश स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दूरभाषद्वारे दिले आहेत.

राज्यात पुणे जिल्ह्यात लंपीमुळे होणारे मृत्यू सर्वांत अल्प !

लंपी आजार नियंत्रणात येण्यासाठी पुणे जिल्ह्यात तत्परतेने लसीकरणावर भर दिल्यामुळे पशूंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर अल्प झाला. पुणे जिल्ह्यात ६३३, तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४ सहस्र ५१० पशूंचा मृत्यू झाला आहे.

मोरगिरी (जिल्हा सातारा) येथे अल्पवयीन मुलीवर मुसलमानाकडून अत्याचार !

पाटण तालुक्यातील मोरगिरी (पेठशिवापूर) येथील २६ वर्षीय मुसलमान युवकाने एका अल्पवयीन मुलीला दमदाटी आणि शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील काही गावांत मौल्यवान सोन्याचे साठे आढळले !

महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा, तसेच आता नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरूपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे आहेत; मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. तसा अहवाल भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिला आहे.

कोरियातील यूट्यूबर महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण !

कोरियातील यूट्यूबर महिलेचा खार येथे विनयभंग करणारे मोबीन शेख आणि महंमद अन्सारी यांची वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.

गोव्यात ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ११ डिसेंबरला होणार समारोप

शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा निर्णय कागदावरच !

या निर्णयाची तातडीने कार्यवाही होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत !

केंद्रातील मागील सरकारांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्याने भारतात जिहादचा प्रसार झाला !

तथ्य-शोधक समितीच्या अहवालाचा निष्कर्ष