जगातील ५०० प्रभावशाली मुसलमानांच्या सूचीमध्ये भारतातील झाकीर नाईकचे नाव !

जॉर्डन देशातील अशासकीय संस्थेची सूची !

(चित्रावर क्लिक करा)

नवी देहली – जॉर्डन देशातील ‘रॉयल ऑल अल्-बायत इन्स्टिट्यूट फॉर इस्लामिक थॉट’ (रॅबिट) या अशासकीय संस्थेने जगातील ५०० प्रभावशाली मुसलमान व्यक्तींची सूची घोषित केली आहे. यात भारत आणि बांगलादेश येथील जिहादी आतंकवाद्यांसाठी आदर्श असणार्‍या आणि भारतातून पलायन कराव्या लागलेला झाकीर नाईक याचाही समावेश करण्यात आला आहे. यासह भारतातील एकूण ५० मुसलमानांचा यात समावेश आहे. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना महंमद मदनी १५ व्या क्रमांकावर आहेत. मदनी यांना ‘मॅन ऑफ द इयर’ (वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती) देखील घोषित करण्यात आले आहे. या सूचीत अभिनेते आमीर खान, अभिनेत्री शबाना आझमी, एम्.आय.एम.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आदींची नावे आहेत. या अहवालामध्ये भारतावर ‘लव्ह जिहाद’वरून टीका करण्यात आली आहे. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल् सौद यांचा या सूचीमध्ये पहिला क्रमांक आहे, तर इराणचे अयातुल्ला अली खामेनी दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

संपादकीय भूमिका

  • ‘लव्ह जिहाद’वरून भारतावर टीका !
  • ‘जिहादी आतंकवादी म्हणजे प्रभावशील व्यक्ती’ असे जर मुसलमान समजत असतील, तर अन्यांनी ‘आतंकवादाला धर्म असतो’, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ?
  • ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असा दावा करून त्यावर टीका करणार्‍यांनी ‘हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुसलमान त्यांची मूळ ओळख लपवून हिंदु नाव का धारण करतात ?’ हे सांगायला हवे !