गुजरातमध्ये ‘रामराज्या’प्रमाणे आदर्श निर्माण करण्यासाठी भाजप सरकारला शुभेच्छा ! – हिंदु जनजागृती समिती

‘गुजरात ही देशातील हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे’, असे म्हटले जाते. आता यापुढे ‘रामराज्या’चे एक आदर्श उदाहरण म्हणूनही प्रचलित व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या शुभेच्छा.

पुण्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित !

हडपसर येथील भूमी प्रकरणात तृप्ती कोलते यांनी दिलेले चुकीचे आदेश, कोरोनाच्या काळात औषध खरेदीतील अनियमितता आणि निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले.

तुर्भे गावात खड्ड्यांचे साम्राज्य !

तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुर्भे गावामध्ये तीन नगरसेवक, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष यांचे वास्तव्य आहे.

रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे डॉक्टर तरुणीचे १०० जणांनी घरात घुसून केले अपहरण !

एका डॉक्टर तरुणीचे अशा प्रकारे अपहरण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे कि नाही ?

सातारा जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायती बिनविरोध !

सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी पार पडल्या आहेत. २४२ गावांमध्ये सरपंचपदासाठी ६५५ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १ सहस्र ८१२ जागांसाठी ३ सहस्र ८९७ जणांनी सदस्यपदासाठी अर्ज प्रविष्ट केला आहे.

बलात्काराच्या प्रकरणी केरळमधील सत्ताधारी माकपच्या युवा नेत्याला अटक

साम्यवाद्यांचा बरबटलेला इतिहास पहाता साम्यवादी केरळ सरकारकडून अशांवर कारवाई होणे दुरापस्तच होय !

हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !

आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.

पाकमध्ये विवाहित हिंदु महिलेचे बलपूर्वक धर्मांतर !

पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिने न्यायाधिशांना, ‘मला माझ्या नातेवाइकांसोबत जायचे आहे. मी माझ्या मुलांपासून दूर राहू शकत नाही’, असे सांगितले.

मंडौस चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या काही भागांत मुसळधार पाऊस: जनजीवन विस्कळीत

तमिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेशातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशातील मुसलमान पोलीस जिहादी झाकीर नाईक याचे समर्थन करणार्‍या फेसबुकच्या गटात !

‘पोलीस दलातील कर्मचारी काय करत आहेत ?’, हे पोलिसांना ठाऊक नसेल,तर कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहू शकेल का ? अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !