कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही ! – मंत्री शंभूराज देसाई

मुंबईतील चित्रपटसृष्टीला कोणत्या कारणासाठी आयुक्तांनी नोटीस काढली आहे ? त्याची माहिती घेऊ आणि मुंबईतील चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिले.

सानपाडा येथील ओरिएंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर अश्लील चाळे, पोलिसांत तक्रार

सानपाडा येथील ओरिएंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर मुलींसह अश्लील चाळे आणि मारामारी केली जाते, अशी तक्रार सानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ठाणे शहरात ‘हर्बल’च्या नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट !

शहरात ‘हर्बल’च्या (वनौषधींच्या) नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली.

दौंड (जिल्हा पुणे) येथील धर्मांतर प्रकरणातील ३ धर्मांधांची येरवडा कारागृहात रवानगी !

येथील भीमा नदीकाठी वीटभट्टीत मजुरी करणार्‍या बबलू चव्हाण या तरुणाने मुसलमान समाजातील विधवा महिलेसमवेत लग्न केल्याने त्यांच्या पत्नीला कुमेल कुरेशी, आसिफ शेख आणि अन्य काही साथीदार यांनी घटस्फोट घेण्यासाठी दबाब टाकला होता.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्या !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर…

पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाई होणार ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

रत्नागिरीत भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यातील १८ सहस्र रुपयांची चोरी

भर दिवसा शहरातील टिळक आळीतील दुकानाच्या गल्ल्यामधून अज्ञाताने १८ सहस्र रुपये चोरी केले आहेत. २८ डिसेंबरच्या दुपारी २.४५ ते ३.२० या कालावधीत घडली.

पोलीस सेवा निवासस्थान प्रकल्पाच्या कालबद्ध कार्यक्रमाला गती देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोरोनामुळे हे प्राधान्यक्रम ठरवता आले नाहीत; मात्र आता प्राधान्यक्रम ठरवण्याचे काम हाती घेतले आहे. या प्राधान्यक्रमात संभाजीनगर येथील पोलीस वसाहतींचाही समावेश केला जाईल.

मालाड येथील पोलीस हौसिंग फेडरेशनला दिलेला भूखंड परत घेणे विचाराधीन ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मालवणी येथील बेस्ट डेपोलगतचा भूखंड १९९९ मध्ये महाराष्ट्र पोलीस को-ऑप.हौसिंग फेडरेशनला दिला होता. ज्या कारणासाठी हा भूखंड दिला होता, तसा त्याचा उपयोग झाला नाही.

‘महाराष्ट्राला धोका मंत्र्यांना खोका’ घोषणा देत विरोधकांचे आंदोलन !

महाविकास आघाडीतील आमदारांनी सत्ताधार्‍यांविरोधात २९ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली. या वेळी आमदारांनी हातात ‘टेलीबर्डचे बोके आणि खाली खोके’ हे लिहिलेले फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला.