सानिया बनणार देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ वैमानिक !

सानिया मिर्जा

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – येथील सानिया या देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ (फायटर) वैमानिक बनणार आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २७ डिसेंबर २०२२ या दिवशी त्या लढाऊ वैमानिक म्हणून पहिले उड्डाण करतील.

याविषयी सानिया म्हणाल्या, ‘‘मी देशाच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक अवनी चतुर्वेदी यांची मुलाखत वाचली होती. तेव्हापासून माझ्या मनात लढाऊ वैमानिक बनण्याची इच्छा निर्माण झाली होती. अवनी चतुर्वेदी यांना मी माझ्या प्रेरणास्रोत मानते. प्रत्येक मुलीने शिकले पाहिजे. मी वैमानिक बनण्यात माझ्या पालकांचे फार मोठे योगदान आहे.’’