पुणे येथे ‘झिका’चा रुग्ण आढळला; दक्षतेचे आदेश !

पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या ६७ वर्षीय पुरुषाला ‘झिका’चा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. पुण्यात आल्यानंतर रुग्णाला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागला. रुग्णाने वैद्यकीय सल्ल्याकरता १६ नोव्हेंबर या दिवशी जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार चालू केले..

तुळजापूर येथे शिवरायांना भवानी तलवार देतांनाचे १०८ फुटी शिल्प उभारणार ! – राणा जगजितसिंह पाटील, आमदार, भाजप

छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेल्या श्री तुळजाभवानीमातेचे १०८ फुटी शिल्प तुळजापूर येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे. या निधीमध्ये लोकसहभागही असणार आहे

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन !

राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने भाविकांसाठी  अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात नृसिंहवाडी-सांगली, नृसिंहवाडी-हुपरी, नृसिंहवाडी-कोल्हापूर, इचलकरंजी यांचा समावेश आहे.

गणेश नाईक ट्रस्टची एस्.एस्.सी. सराव परीक्षा महाराष्ट्रासाठी एक आदर्श – राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त

‘गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने घेण्यात येणारी एस्.एस्.सी. सराव परीक्षा ही महाराष्ट्रासाठी एक आदर्श असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नेरुळ येथे केले.

येत्या ६ मासांमध्ये ठाणे खड्डे आणि कचरा मुक्त करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मी एक जोरदार, तसेच धाडसी माणूस वाटलो. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. ठाण्यात सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली असून येत्या ६ मासांमध्ये ठाणे खड्डे आणि कचरा मुक्त करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिले.

(म्हणे) ‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांनी संघटित होऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍याला निवडावे !’

‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्‍न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ?

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करण्यासाठी पुणे विद्यापिठातील प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन !

विज्ञाननिष्ठ समजले जाणारे पाश्‍चात्त्य मन:शांतीसाठी हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. निवळ हिंदुद्वेषापायी ही प्राध्यापक मंडळी हा अभ्यासक्रम रहित करण्याचा प्रयत्न करत आहेत !

ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी पुणे येथे पत्नीचा २१ वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ !

हिंदु धर्म त्यागून ख्रिस्ती किंवा मुसलमान बनलेले कट्टर हिंदुद्वेषी होतात, वारंवार घडणार्‍या धर्मांतराच्या घटना रोखून केंद्र सरकारने आतातरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !

मुंबईतील आग्रीपाडा या हिंदूबहुल वस्तीत ‘उर्दू लर्निंग सेंटर’ बांधण्याचे षड्यंत्र !

मुसलमानबहुल भागात ‘संस्कृत लर्निंग सेंटर’ बांधण्याचे धारिष्ट्य प्रशासनाने केले असते का ? असे करण्याचा प्रयत्न जरी झाला असता, तरी त्याचे परिणाम काय झाले असते, हे प्रशासनाला चांगलेच ठाऊक आहे !

सातारा येथे १० सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी जन आक्रोश मोर्चा !

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे म्हणाल्या की, हिंदु वंशविच्छेदासाठी आतापर्यंत तलवारीच्या जोरावर धर्मयुद्धे झाली, आता जनसंख्येच्या आधारे युद्धे होत आहेत.