पिंपळेगुरव (पुणे) येथील रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी अभियंत्यासह चौघांच्या विभागीय चौकशीचे आदेश !

पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते नर्मदा गार्डन या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे होत असतांना नियंत्रण आणि पर्यवेक्षण न ठेवल्याचा ठपका ठेवत स्थापत्य विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंताची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखरसिंह यांनी दिले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकेची धमकी !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पवनाथाडी यात्रेसाठी येणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा शाईफेकेची धमकी दिली आहे. ‘पत्रकार मित्रांनो, आज पण चांगला अँगल घ्या, चंपाचे तोंड काळे करा रे’, अशी धमकीवजा चेतावणी त्यांना दिली आहे.

श्रीक्षेत्र अरण येथे संत काशिबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी !

तालुक्यातील श्रीक्षेत्र अरण येथे राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने संत काशीबा गुरव महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीक्षेत्र अरण येथे संत काशिबा महाराजांचे समाधीस्थळ असून या समाधीस्थळावर महाअभिषेक करून अभिवादन करण्यात आले.

श्रीराम हे खरे मर्यादापुरुषोत्तम, आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पुत्र, एकपत्नी-एकवचनी अवतारी पुरुष होय ! – पू. संजयगुरुजी

भारताची वैशिष्ट्ये त्याच्या नावातच लपलेली आहेत. ‘भा’ म्हणजेच भक्ती, विवेक आणि तेज यामध्ये ‘रत’ म्हणजेच मग्न असलेल्या चारित्र्यसंपन्न लोकांचा म्हणजेच ‘साधना करणारे साधक’ यांचा देश म्हणजे भारत होय.

जोधपूरमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना फेरफटका मारण्याच्या नावाखाली चर्चमध्ये नेले !

शाळेत श्री सरस्वतीदेवीचे चित्र असण्यावरून, तसेच श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे’, अशी ओरड करणारे पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले आदी आता या घटनेविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी ‘हिंदु आतंकवाद’ संकल्पना मांडली गेली ! – स्मिता मिश्रा, लेखिका

वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटात आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी भारतीय सैन्यातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांचा चेहरा वापरून ‘हिंदु आतंकवाद’ ही खोटी संकल्पना मांडली गेली.

(म्हणे) ‘सरस्वती शिशु मंदिरांचीही तपासणी झाली पाहिजे !’

सरस्वती शिशु मंदिरांतून कधीही आतंकवादी, वासनांध निर्माण होत नाहीत, हे जगजाहीर आहे, तसे मदरशांविषयी नाही, हे मसूद यांनाही ठाऊक आहे ! तरीही ते अशा प्रकारे विधान करून त्यांच्या मुसलमान मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत !

‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला २३ वर्षांची शिक्षा !

सातारा येथील खासगी शिकवणीचालक समीर बाबासाहेब मुजावर (वय ३८ वर्षे) याला मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या अंतर्गत २३ वर्षांची शिक्षा ठोठावली.

फुटबॉल विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव झाल्याने फ्रेंच नागरिकांकडून हिंसाचार

अशा प्रकारचा हिंसाचार करून स्वतःच्याच देशाच्या संपत्तीची हानी करणारे कोणते देशप्रेम दाखवत आहेत ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !

दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?