चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
चॉकलेट घशात अडकल्याने कोडोली परिसरातील शर्वरी सुधीर जाधव या १ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. शर्वरीला एका मुलीने जेलीचे चॉकलेट खाण्यास दिले. तिने चॉकलेट खाल्ल्यानंतर ती खोकू लागली. नंतर ती बेशुद्ध पडली.
चॉकलेट घशात अडकल्याने कोडोली परिसरातील शर्वरी सुधीर जाधव या १ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. शर्वरीला एका मुलीने जेलीचे चॉकलेट खाण्यास दिले. तिने चॉकलेट खाल्ल्यानंतर ती खोकू लागली. नंतर ती बेशुद्ध पडली.
येथील जिल्हा रुग्णालयात २५ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता २ गटांत तुंबळ हाणामारी झाली. २७ क्रमांकाच्या खोलीत उपचार घेणार्या २ रुग्णांना बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत ५-६ जण गंभीर घायाळ झाले आहेत.
झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रहित करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जैन समाजाने २६ डिसेंबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवेदन स्वीकारले.
कर्नाटक सरकारने ‘एक इंचही भूमी आम्ही महाराष्ट्राला देणार नाही’, असा ठराव केल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक, माता-भगिनी आणि बांधव आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा ठराव केला.
गोवंशियांची वारंवार होणारी अवैध वाहतूक, हा संबंधित आरोपींवर ठोस कारवाई न केल्याचा परिणाम !
मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्ट अधिकार्यांवर केवळ ६ मासांकरता निलंबनाची कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी निलंबित करून कायदेशीवर कारवाई व्हायला हवी. यासाठी कायद्यात आवश्यक पालट करावा.
आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर फडणवीस यांनी वरील आश्वासन दिले. येत्या ३ मासांत याविषयीचा आदेश निर्गमित करण्यात येईल.
आता पुरोगाम्यांना याविषयी पोटशूळ उठून त्यांनी यावर टीका केल्यास आश्चर्य वाटू नये !
केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांचे केंद्रीय पुरातत्व विभाग स्वत: काम करत नाही आणि आम्हालाही एक इंचही पुढे जाऊ देत नाही !