युवा शेतकरी श्याम गावकर यांच्या कष्टाने साट्रे (तालुका सत्तरी) येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन यशस्वी
सत्तरी हा उत्तर गोव्यातील शेवटचा ग्रामीण तालुका ! काजू, सुपारी, नारळ, केळी, आंबा अशी शेती उत्पादने येथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या उत्पादनांमध्ये आता स्ट्रॉबेरीचीही भर पडली आहे. सत्तरीतील युवा प्रगतशील शेतकरी श्याम गावकर यांनी म्हादई अभयारण्यातील साट्रे गावात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.