नवी देहली – बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांना प्रत्युत्तर म्हणून देहलीतील काही व्यापार्यांनी बांगलादेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी गेट येथील ऑटो पार्ट्स व्यापार्यांनी बांगलादेशासमवेतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
२ सहस्र दुकानांनी बांगलादेशाला निर्यात करणे बंद केले !
ऑटोमोटिव्ह पार्ट्स मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विनय नारंग म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत आहेत. तेथे आमची मंदिर उद्ध्वस्त झाली आहेत. आमचे अनेक हिंदु बांधव मारले गेले. यामुळे आमच्या बाजारातील व्यापार्यांनी बांगलादेशासमवेतचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीपर्यंत सुट्या पार्ट्सची निर्यात रोखण्याचा निर्णय तिथल्या वाहतुकीवर परिणाम करू शकतो. जवळपास २ सहस्र दुकानांनी बांगलादेशाला निर्यात करणे बंद केले आहे.
संपादकीय भूमिकादेहलीतील व्यापार्यांचा अभिनंदनीय निर्णय ! जे सरकारने करणे अपेक्षित आहे, ते आता जागृत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना करावे लागत आहे ! |